'बडे अच्छे लगते है' या मालिकेतून घराघरात पोहचलेल्या आणि प्रेक्षकांच्या मनात आपलं विशेष स्थान निर्माण करणाऱ्या अभिनेता राम कपूरला आतापर्यंत बऱ्याच पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. पण आजपर्यंत असा एक पुरस्कार रामला मिळाला नाही, ज्याची त्याला खंत वाटते आहे. हा मानाचा पुरस्कार म्हणजे ऑस्कर. पण त्याला हा पुरस्कार मिळाला नसला तरी त्याच्या मुलाला या पुरस्कराने गौरवण्यात आलं आहे.
रामचा मुलगा अवघ्या नऊ वर्षांचा आहे. एवढ्या लहान वयात त्याला ऑस्करने गौरवण्यात आलं आहे. त्याला सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे. आपल्या मुलाला हा पुरस्कार मिळाल्याबद्दल राम कपूरने सोशल मीडियावरून आनंद व्यक्त केला आहे. त्याने ट्विटरवर या पुरस्काराचा एक फोटोही शेअर केला आहे.
राम म्हणतो 'आपण जे करू शकलो नाही, ते आपल्या मुलाने करून दाखवलं'. पण रामच्या या पोस्टने तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की रामच्या मुलाला ऑस्कर मिळाला तरी कसा?