7 व्या यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला प्रारंभ

  • संतोष मोरे & मुंबई लाइव्ह टीम
  • मनोरंजन

नरिमन पॉइंट - साहित्यासोबतच चित्रपटही आपलं जीवन समृद्ध करत असतात. बॉलिवूडसोबतच आता मराठी सिनेमाही सध्या सर्वांगाने प्रगल्भ झालेला दिसत आहे. या वेळी चतुरस्त्र अभिनेता पंकज कपूर यांनी मराठी सिनेमांचं भरभरून कौतुक केलं. निमित्त बहुचर्चित यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2017 चे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत हा उद् घाटन सोहळा पार पडला. या वेळी अभिनेता पंकज कपूर यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल शरद पवारांच्या हस्ते गौरवण्यात आलं.

महोत्सवात प्रतिष्ठानचे महोत्सव संचालक जब्बार पटेल, सरचिटणीस शरद काळे, मुख्य समन्वयक महेंद्र तेरेदेसाई, समन्वयक संजय बनसोडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे कोषाध्यक्ष हेमंत टकले आदी मान्यवर उपस्थित होते. यंदा या महोत्सवात चित्रपट रसिकांसाठी विविध भाषेतील आणि विविध देशातील 74 चित्रपटांची मेजवानी आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या