असा पार पडला सोनम कपूरचा लग्न सोहळा

  • मुंबई लाइव्ह टीम & राजश्री पतंगे
  • मनोरंजन

बॉलिवूडमधील फॅशनिस्टा अशी ओळख असलेली अभिनेत्री सोनम कपूर ही तिचा उद्योगपती बॉयफ्रेंड आनंद अहूजासोबत 8 मे रोजी लग्नबंधनात अडकली. सोनमची वेडिंग सेरेमनी तिच्या नातेवाईकाच्या घरी फॅशन डिझायनर कविता सिंग यांच्या बॅण्डस्टॅण्ड येथील आलिशान बंगल्यात पार पडलं. 

लग्नाचा सर्व विधी त्या घरातील मंदिरात संपन्न झाला. यावेळी लाल रंगाच्या लेहंग्यात सोनम कपूर भलतीच खुलून दिसत होती.

रिसेप्शन कुठे?

दरम्यान मंगळवारी संध्याकाळी कपूर आणि अहूजा कुटुंबियांनी मुंबईतील लीला येथे ग्रँड रिसेप्शनचं आयोजन केलं आहे. या लग्नसोहळ्याच्या ग्रँड रिसेप्शनसाठी पारंपरिक ड्रेस कोड असणार आहे.

संगीत मेहेंदीही जल्लोषात

सोनमच्या संगीत आणि मेहेंदी सेरमनीचा कार्यक्रमही मोठ्या गाजावाजात पार पडला. यावेळी स्टार कलाकारांची मांदियाळी होती. रविवारी संध्याकाळी तिच्या हळदीच्या कार्यक्रमातही मोठा जल्लोष पाहायला मिळाला. यावेळी नवरी सोनमने आपल्या नवऱ्यासोबत 'लत लग गई' या गाण्यावर ठुमके लगावले. 

लाडक्या लेकीच्या संगीत कार्यक्रमात वडील अनिल कपूर, अर्जुन कपूर, अंशुला कपूर यांनी देखील यावेळी बहारदार डान्स केला.

कोण आहे आनंद?

आनंद आणि सोनम यांच्या अफेअरची चर्चा 2016 पासून आहे. पण या दोघांनी कधीही त्यांच्या न्यात्याविषयी कधीही जाहिरपणे सांगितलं नाही. आनंद हा देशातील सर्वात मोठ्या एक्सपोर्ट हाऊसचे मालक असलेले हरिष आहुजा यांचा मुलगा आहे. सध्या आनंद या कंपनीचा व्यवस्थापकीय संचालक आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या