पुल कला महोत्सव 2016

  • पूनम कुलकर्णी & मुंबई लाइव्ह टीम
  • मनोरंजन

दादर - पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी मुंबई आणि पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभाग मंत्रालय यांच्या वतीने 8 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर दरम्यान पुल कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कला महोत्सवात जुन्या चित्रपटांच्या दुर्मिळ पोस्टर्सचं प्रदर्शन ही ठेवण्यात आलंय. सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यांच्याच हस्ते दिप प्रज्वलन आणि उद्घाटन केलं. या वेळी राज दत्त, किरण शांताराम, अरुण काकडे, पुरुषोत्तम लेले, पंडित सत्यशील देशपांडे यांच्यासह कला क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली. उद्घाटन प्रसंगी बोलताना सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे म्हणाले, पुढच्या वर्षी हा महोत्सव केवळ पुल अकादमी आणि रविंद्र नाट्यमंदीर परिसरात न होता महाराष्ट्रातल्या किमान 100 महाविद्यालयांमध्ये होईल यासाठी मी प्रयत्न करणार आहे. त्यानिमित्ताने आपण पुलंचे अष्टपैलू व्यक्तीमत्व महाराष्ट्रातल्या तरुणाई पर्यंत पोहचवण्याचा हा प्रयत्न असेल.

पुढील बातमी
इतर बातम्या