मेट गालामध्ये प्रियंकाची हजेरी, पेहरावावरून झाली ट्रोल

संपूर्ण फॅशन विश्वाचं लग्न लागून राहिलेला मेट गाला २०१९ हा सोहळा नुकताच पार पडला. न्युयॉर्कमधील प्रतिष्ठेचा मानला जाणारा मेट गाला २०१९ मध्ये यावेळी नोट्स ऑन फॅशन ही थीम ठेवण्यात आली होती. या मेट गालासाठी भारतीय अभिनेत्री प्रियंका चोप्रा तिचा पती निक जोनास एकत्र दिसले. मात्र यावेळी प्रियंकानं घातलेल्या ड्रेसवरून ती सोशल नेटवर्किंग साईट्सवर चांगलीच ट्रोल झाली. तिच्यावर करण्यात येणारे मिम्स पाहून तुम्हाला देखील हसू आवरणार नाही.


पुढील बातमी
इतर बातम्या