'मी मुस्लिम नाही. पण सकाळी अजानच्या आवाजानेच मला जाग येते. भारतात बळजबरीने चालणाऱ्या रुढी कधी थांबणार? असे ट्विट नुकतेच प्रसिद्ध गायक सोनू निगम याने केले होते.
त्याच्या या वक्तव्याचे पडसाद सगळीकडे उमटू लागले आहेत. मंगळवारी गोवंडी येथे सोनू निगम याने केलेल्या वक्तव्याविरोधात मुस्लिम बांधवांनी जोरदार घोषणाबाजी केली. गोवंडीच्या शिवाजीनगर सिग्नल येथे नगरसेवक सिराज शेख यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी मुस्लिम बांधवांनी सोनू निगमवरील आपला रोष व्यक्त केला.
एकीकडे सामान्य नागरिकांकडून सोनी निगमच्या वक्तव्याचा निषेध केला जात असतानाच बॉलिवुडमधून मात्र त्याची पाठराखण केली जात आहे.