रवि तेजाचा ‘रामाराव ऑन ड्यूटी’ चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज

साउथचा सुपरस्टार रवि तेजा याचा बहुप्रतिक्षित ‘RT68’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आलाय. सोबतच चित्रपटाचं नाव देखील जाहीर करण्यात आलंय. ‘रामाराव ऑन ड्यूटी’ असं या चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये ‘मास महाराजा’ रवि तेजाचा इंटेस लूक दिसून येतोय.

त्याच्या लूकला प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळतेय. सुपरस्टार रवि तेजा आणि चित्रपटाच्या मेकर्सनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून हे पोस्टर रिलीज केलंय. चित्रपटाचं पोस्टर रिलीज केल्यानंतर काही वेळातच याला लाखो लाईक्स मिळाले आहेत.

‘रामाराव ऑन ड्यूटी’ या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये रवि तेजा खूपच इंटेस लूकमध्ये दिसून येतोय. यात त्याने डोळ्यांवर चष्मा लावलेला दिसून येतोय. त्याच्या मागे एक सरकारी गाडी उभी असलेली दाखवण्यात आलीय. यावरून या चित्रपटात रवि तेजा एका सरकारी अधिकाऱ्याच्या भूमिकेत असू शकतो,असा अंदाज लावण्यात येतोय. या पोस्टरमध्ये इंग्रजीत लिहिलंय, “मी शपथ घेतो की, मी प्रामाणिक राहिल आणि भारतीय राज्यघटनेशी खरी निष्ठा बाळगेल…कायद्याने स्थापित केल्यानुसार मी भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडतेचे समर्थन करीन, तसंच मी माझ्या कार्यालयाची कर्तव्ये विश्वासाने, प्रामाणिकपणाने आणि निःपक्षपातीपणे पार पाडणार आहे.”

१ जुलै रोजी सुपस्टार रवि तेजा यानं ‘RT68’ चित्रपटाचं शूटिंग सुरू झाल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर या चित्रपटाचं पोस्टर लॉंच केलंय. ज्यावेळी रवि तेजा याच्या RT68 चित्रपटाची घोषणा झाली, त्यानंतर सोशल मीडियावर ‘रामाराव ऑन ड्यूटी’ ट्रेंड होऊ लागलं.

सरथ मांडवा दिग्दर्शित ‘रामाराव ऑन ड्यूटी’ चित्रपटाचं शूटिंग गेल्या १ जुलै रोजी हैदराबाद इथून सुरू झालंय. यापूर्वी ‘खिलाडी’ फेम अभिनेता रवि तेजानं या चित्रपटाच्या सेटवरचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. रवि तेजाचा ‘रामाराव ऑन ड्यूटी’ हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित असल्याचं बोललं जातंय.


हेही वाचा

‘मिशन इम्पॉसिबल’मध्ये मुख्य भूमिकेत झळकणार तापसी पन्नू

'दृश्यम'नंतर मोहनलाल यांच्या नव्या थ्रिलरची घोषणा

पुढील बातमी
इतर बातम्या