आठवणीतले नाना चिपळुणकर

  • पूनम कुलकर्णी & मुंबई लाइव्ह टीम
  • मनोरंजन

दादर - स्वरांगित चॅरिटेबल ट्रस्ट नालासोपारा आणि चिपळुणकर कुटुंबिय आयोजित कै. विष्णुगणेश ऊर्फ नाना चिपळुणकर यांचा स्मृतीदिन 25 सप्टेंबर रोजी पार पडला. यावेळी स्वरांगीत तर्फे रागगिरी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रागगिरी अंतर्गत संगीतकार सचिनदेव बर्मन आणि हेमंतकुमार यांच्यावरील कार्यक्रम यावेळी सादर करण्यात आले. या कार्यक्रमात ग्वाल्हेर घराण्याचे गायक तथा समिक्षक अमरेंद्र धनेश्वर यांनी गायन केले. राग गायनाचे प्रात्यक्षिक आणि मुळ ध्वनीमुद्रीत गाण्याचे श्रवण असे या कार्यक्रमाचे स्वरुप होते. धनेश्वर यांना कैलास पात्र यांनी व्हायोलिन आणि शंतनु शुक्ल यांनी तबल्यावर साथ संगीत दिली.

पुढील बातमी
इतर बातम्या