शिव, बानूमध्ये 'लागिरं झालं जी'

  • मुंबई लाइव्ह टीम & मुंबई लाइव्ह नेटवर्क
  • मनोरंजन

काहे दिया परदेस या मालिकेमुळे मुलींच्या गळ्यातील ताईत बनलेला हँडसम ऋषी सक्सेना अाणि जय मल्हारमधील बानूची भूमिका रेखाटणारी ईशा केसकर यांच्यात 'लागिरं झालं जी' अशी चर्चा काही दिवसांपासून रंगली होती. अाता ऋषी सक्सेनाने ईशासोबतच्या फोटो शेअर केल्याने अाता या चर्चेला अाणखीनच उधाण अालं अाहे. या फोटोत ऋषीनं वेगळ्या अंदाजात व्हॅलेंटाइन डेच्या शुभेच्छाही दिल्या अाहेत.

 

आपल्या खास अंदाजात ईशानेही 'हॅप्पी व्हॅलेंटाईन डे बेबी' असं लिहून एक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोला तिच्या फॅन्सने भरपूर प्रतिक्रिया देत शुभेच्छा दिल्या अाहेत.

 

झी मराठीवरील काहे दिया परदेस या मालिकेतून ऋषी प्रेक्षकांसमोर आला. एका अमराठी मुलाने साकारलेली ही भूमिका प्रेक्षकांनीही डोक्यावर घेतली. ऋषीने आपल्या अभिनयाने सगळ्यांचीच मनं जिंकली. तर ईशा केसकरने झी मराठीवरील जय मल्हार या मालिकेत बानूची भूमिका साकारली होती. काही दिवसांपूर्वी ऋषीने ईशाबरोबरचा एक फोटो शेअर केला होता. मात्र व्हॅलेंटाईन डेला शेअर केलेल्या या फोटोमुळे पुन्हा एकदा नातं पुढे गेल्याची चर्चा सुरू झाली आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या