पुन्हा एकदा 'सरकार' राज

  • रेणुका गरकल & मुंबई लाइव्ह टीम
  • मनोरंजन

अंधेरी - रामगोपाल वर्मा यांच्या 'सरकार 3' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. अंधेरीतल्या सिनेपोलीस थिएटरमध्ये चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. या वेळी अमिताभ बच्चन, जॅकी श्रॉफ, यामी गौतम, अमित सध, रोहिणी हट्टंगडी आदी उपस्थित होते.

बॉलीवूड शहेनशाह पुन्हा एकदा सुभाष नागरेच्या भूमिकेत पाहायला मिळतील. तर अमित सध अमिताभ यांच्या नातवाची भूमिका साकारणार आहे. आपल्या नातवाचा पाठिंबा घेऊन सुभाष नागरे निर्भयपणे शत्रूंशी लढताना दिसेल. तसेच "मी मागे हटणार नाही," असे मराठी संवादही अमिताभ बच्चन या ट्रेलरमध्ये बोलताना दिसतील. तर जॅकी श्रॉफ यामध्ये नकारात्मक भूमिका साकारताना दिसतील. 'सरकार 3' हा चित्रपट 7 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. 'सरकार 3' चा ट्रेलर पाहून तर चित्रपट पाहण्याची उत्सुकता सर्वांनाच लागली असेल.

पुढील बातमी
इतर बातम्या