अॅव्हेंजर्स सीरीज संपली, पण मार्व्हल्सचे हे ७ सिनेमे आहेत ना!

अनेकांना मार्व्हलच्या सिनेमांनी अक्षरशः वेड लावलं. मार्व्हलचा अॅव्हेंजर सीरीजमधील शेवटचा भाग सगळ्यांनी पाहिला असेलच. ३ तासांच्या या सिनेमाचा शेवट पाहून अनेकांना अश्रू अनावर झाले. आर्यन-मॅनपासून मार्व्हल्सचा प्रवास सुरू झाला होता. पण अॅव्हेंजर्स सीरीजचा प्रवास जरी संपला असला तरी पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त असंच म्हणावं लागेल.  कारण येत्या काळात मार्व्हलचे तब्बल सात चित्रपट येणार आहेत. त्यामुळे चाहत्यांसाठी ही नक्कीच आनंदाची बातमी आहे. 

१) स्पायडरमॅन फार फ्रॉम होम

स्पायडरमॅन होमकमिंगचा सीक्वल स्पायडरमॅन फार फ्रॉम होम हा चित्रपट २ जुलै २०१९ला रिलीज होत आहे. सिनेमा एंडगेमनंतर हा मार्व्हल्सचा पहिला चित्रपट असणार आहे. चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलरमध्ये एंडगेमनंतर स्टोरी पाहायला मिळत आहे. हा चित्रपट सिनेमॅटिक युनिवर्सच्या तिसऱ्या फेजमधला शेवटचा चित्रपट आहे.   

२) ब्लॅक पँथर

मार्व्हल पिक्चर्समधला ब्लॅक पँथर हा एकमेव सिनेमा ऑस्करच्या बेस्ट पिक्चरसाठी नामांकित झाला होता. हाच ब्लॅक पँथर त्याच्या सिक्वलमधून पुन्हा आपल्या भेटीसाठी येत आहे. दिग्दर्शक रायन कुगलरवर या सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सोपवली आहे. मात्र, अजून या सिनेमाची अधिकृत घोषणा झालेली नाही.

३) ब्लॅक विडो प्रीक्वल

ब्लॅक विडोला तिच्या स्वतःच्या सिनेमात पाहण्याची तुमची इच्छा पूर्ण होणार आहे. या सिनेमात स्कारलेट जॉन्सन तिचा अव्हेंजर्समधला रोल आणि आधीची स्टोरी उलगडून सांगणार आहे. सिनेमाचे दिग्दर्शन केट शार्टलँड हे करणार आहेत आणि तेच नताशा रोमानोफची पूर्ण स्टोरी सांगणार आहेत. रशियन हेर असलेली नताशा कशी अमेरिकन हेरगिरी करणारी संस्था शील्डसाठी काम करू लागते हे यात पाहायला मिळणार आहे. 

४) डॉक्टर स्ट्रेंज

बेनेडिक्ट कंबरबॅक आपल्या अफलातून अभिनयातून पुन्हा एकदा डॉक्टर स्ट्रेंज साकारणार आहे. डॉक्टर स्ट्रेंजचा सीक्वल येतोय आणि डायरेक्टर स्कॉट डेरिक्सन पुन्हा एकदा कमबॅक करायला सज्ज झाले आहेत.

५) गार्डियन्स ऑफ गॅॅलक्सी व्हॉल्यूम ३

२०१८ साली आधीच्या दोन्ही सिनेमांचे डायरेक्टर असलेल्या जेम्स गन यांना लहान मुलांच्या लैंगिक शोषण आणि रेपबद्दलच्या आक्षेपार्ह ट्विट्समुळे काढून टाकण्यात आलं होतं. तर आता पुन्हा त्यांना मार्व्हलनं गार्डियन ऑफ गैलक्सीच्या वॉल्यूम ३ साठी बोलावून घेतल्याची चर्चा सुरु झाली आहे. या सिनेमाचं शूटिंग २०२१ ला सुरू होईल असे सांगण्यात येत आहे.

६) द इटर्नल्स

स्वर्गीय शक्तींद्वारा निर्माण झालेल्या 'द इटर्नल्स'ची स्टोरी हा सिनेमा सांगणार आहे. त्यांच्याकडे दैवी शक्ती असतील आणि ते वाईट लोकांकडून चांगल्या लोकांचे रक्षण करतील. या सिनेमात मुख्य भूमिकेत हॉलीवूड सुपरस्टार अँजेलीना जोली असणार असल्याची चर्चा आहे.

७) शांग ची

हा मार्व्हलचा एशियन हिरो असलेला पहिला चित्रपट असणार आहे. मार्शल आर्टमधला मास्टर असलेल्या मुलाची ही स्टोरी असणार आहे. दिग्दर्शक डेस्टिन क्रेटन कॅप्टन मार्व्हल ब्री लार्सन सोबत याआधी काम केले आहे. तेच हा चित्रपट डायरेक्ट करणार आहेत.


पुढील बातमी
इतर बातम्या