अभिनेत्री श्रुती उल्फतची जामिनावर सुटका

  • शिवशंकर तिवारी & मुंबई लाइव्ह टीम
  • मनोरंजन

मुंबई - गळ्यात कोब्रा घेऊन काढलेला व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्याप्रकरणी अभिनेत्री श्रुती उल्फतची जामिनावर सुटका झाली आहे. मुंबईतील बोरीवली कोर्टाकडून 5000 रुपयांच्या जातमुचलक्यावर तिला जामीन मंजूर झाला आहे. कोब्रा गळ्यात घालून काढलेला व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अभिनेत्री श्रुती उल्फतला गुरुवारी अटक करण्यात आली होती.

श्रुती उल्फत, पर्ल पुरी यांच्यासह नितिन सोलंकी आणि उत्कर्ष बाली या दोन प्रॉडक्शन मॅनेजरना 22 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. परंतु जामीन मंजूर झाल्याने श्रुतीला तात्पुरता दिलासा मिळाला आहे. वन्य जीव अधिनियमाचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली चौघांवर ही कारवाई करण्यात आली होती.

काही महिन्यांपूर्वी छोट्या पडद्यावर ‘नागार्जुन..एक योद्धा’ ही मालिका ‘लाईफ ओके’ वाहिनीवर गाजली होती. या मालिकेत भूमिका करणाऱ्या अभिनेत्री श्रुती उल्फतने गळ्यात नाग घालून दोन व्हिडिओ ‘इन्स्टाग्राम’वर पोस्ट केले होते. हा व्हिडिओ ऑक्टोबर 2016 मध्ये मालिकेच्या प्रमोशनसाठी तयार करण्यात आला होता. श्रुतीने तो व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला.

वन विभागाने सोशल मीडियावरील व्हिडिओ डाऊनलोड करुन मुंबईच्या कलिनामधील फॉरेन्सिक लॅबला परीक्षणासाठी पाठवला होता. 17 जानेवारीला त्याचा रिपोर्ट मिळाल्यावर त्या व्हिडिओत जिवंत साप वापरल्याचं दिसून आलं.

पुढील बातमी
इतर बातम्या