बिग बी अमिताभ बच्चन यांची मुलगीही आता अभिनयात!

  • मुंबई लाइव्ह टीम & शिव कटैहा
  • मनोरंजन

बॉलिवुडचे महानायक अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन हे दोघे बच्चन सध्या बॉलिवुडमध्ये अॅक्टिव्ह आहेत. मात्र, अमिताभ बच्चन यांची मुलगी आणि अभिषेक बच्चनची बहीण श्वेता बच्चन नंदा ही आजपर्यंत चित्रपट क्षेत्रच काय, पण एकूणच अभिनयापासून दूरच राहिली आहे. आता मात्र श्वेताने पडद्यावर पदार्पण करण्याचा निर्णय घेतला आहे. आणि तेही बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत!

बाप-बेटीची जोडी दिसणार सोबत!

श्वेता एक डॉक्टर आहे. याआधी कधीही श्वेता मोठ्या स्क्रिनवर दिसलेली नाही. मात्र आता तिने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. वडील अमिताभ बच्चन यांच्यासोबत ती स्क्रिन शेअर करणार आहे. कल्याण ज्वेलर्सच्या एका जाहिरातीमध्ये लवकरच ही बाप-बेटीची जोडी दिसणार आहे. या जाहिरातीचं शुटिंगही पूर्ण झालं आहे.

जुलै महिन्यात श्वेता पडद्यावर!

बिग बी अमिताभ बच्चन हे २०१२ सालापासून कल्याण ज्वेलर्सचे ग्लोबल ब्रॅण्ड अॅम्बेसिडर आहेत. याच ब्रॅण्डच्या एका जाहिरातीमध्ये श्वेता दिसणार आहे. मल्याळी भाषेतही ही जाहिरात होणार असून त्यात त्यांच्या मुलीच्या भूमिकेत मंजू वॉरियर दिसणार आहे. जुलै महिन्यात ही जाहिरात प्रसारित केली जाणार आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या