मुस्लिम नसूनही अजानच्या आवाजाने येते जाग - सोनू निगम

प्रसिद्ध गायक सोनू निगम सध्या चांगलाच चर्चेत आहे. या वेळी तो त्याच्या कोणत्या गाण्यासाठी नाही तर त्याने ट्विटरवर केलेल्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आहे. देव सर्वांचं भलं करो. मी मुस्लिम नाही. पण सकाळी अजानच्या आवाजानेच मला जाग येते. भारतात बळजबरीने चालणाऱ्या रुढी कधी थांबणार? असे ट्विट त्याने केले आहे.

त्याच्या या ट्विटमुळे धार्मिक भावना दुखावल्याची प्रतिक्रीया देत अनेकांनी त्याच्यावर टीका केली आहे. मी हिंदू आहे पण जे हिंदू नाहीत, त्यांचीही गणेशोत्सव आणि नवरात्रौत्सवात गैरसोय होत असते, असे एका नेटिझनने म्हटले आहे. तर त्याच्या एका चाहत्यानेही त्याच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. मी तुझा चाहता आहे. भारतात लोकशाही आहे. त्यामुळे आपण दुसऱ्यांच्या भावनांचा आदर केला पाहिजे, असेही त्याला सुनावले.


याच वादात उडी घेतली आहे ती बिग बॉस फेम अभिनेता एजाज खान याने. जो माझ्या धर्माच्या विरुद्ध बोलणार त्याचा मी आदर करू शकत नाही, असे उत्तर एजाज खान याने दिले आहे.

https://twitter.com/sonunigam">@sonunigam It's wrong sonu u didn't heard that what r parents thought us wake up early and do ur Riaz in the Mrng so u can beat https://twitter.com/raiisonai">@raiisonai

सोनूच्या ट्विटला विरोध झाल्यानंतर त्याने पुन्हा तीन ट्विट केले. जेव्हा मोहम्मद पैगंबर यांनी इस्लामची स्थापना केली होती, तेव्हा विजेची सोय नव्हती. तर मग, एडिसनच्या संशोधनानंतर हे चोचले कशाला? असा प्रश्न सोनूने उपस्थित केला. सोनूने या सर्व प्रकाराला गुंडागर्दी असे संबोधले आहे.




पुढील बातमी
इतर बातम्या