आयकर विभागाच्या कारवाईनंतर अखेर सोनू सूदनं सोडलं मौन, म्हणाला...

अभिनेता सोनू सूदनं परदेशी देणगीदारांकडून क्राउडफंडिंग प्लॅटफॉर्मचा वापर करून २.१ कोटी रुपये गोळा केले. पण परदेशी योगदान (नियमन) कायद्याचे उल्लंघन केलं आहे, असंही आयकर विभागाकडून सांगण्यात आलं होतं. यानंतर सोनू सूदनं एक पोस्ट शेअर केली आहे.

सोनूनं सोशल मीडियावर एक स्टेटमेंट जारी करत काळ सर्व गोष्टींचा उलगडा करेल असं म्हंटलं आहे. तो म्हणाला की ”जेव्हा प्रत्येक भारतीयांचा आशिर्वाद पाठिशी असतो तेव्हा खडतर मार्गावरील प्रवासही सोपा वाटू लागतो.”

तर स्टेटमेंटमध्ये तो म्हणाला, “आपल्याला स्वत:ची बाजू मांडण्याची गरज नसते. काळ सर्व सांगतो. मी माझ्या परीनं आणि मनापासून प्रत्येक भारतीयाची सेवा करण्याची शपथ घेतली आहे. माझ्या फाउंडेशनमधील प्रत्येक रुपया एक अनमोल जीव वाचवण्यासाठी आणि गरजूंपर्यंत पोहोचण्यासाठी आहे. याव्यतिरिक्त, अनेक प्रसंगी, मी विविध ब्रॅण्डसना माझ्या कामाची फी गरजुंना दान करण्यासाठी प्रोत्साहित केलंय. काही पाहूण्यामुळे मी गेल्या चार दिवसांपासून व्यस्त असल्यानं तुमच्या सेवेत येऊ शकलो नाही. आता मी पुन्हा आलो आहे. माणुसकीसाठी माझी सेवा अशीच सुरू राहिल.” यासोबतच सोनूनं लिहलं की, “कर भला, हो भला, अंत भले का भला. जय हिंद”

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोनू सूदला पाठिंबा दिला आहे. “सोनू सूद तुम्हा लाखो भारतीयांचे हिरो आहात” असं ट्वीट करत अरविंद केजरीवाल यांनी सोनूचं कौतुक केलंय.

कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान गेल्या वर्षी जुलैमध्ये स्थापन केलेल्या त्याच्या ना-नफा सूद चॅरिटी फाउंडेशननं यावर्षी एप्रिल महिन्यापर्यंत १८ कोटींपेक्षा जास्त देणगी गोळा केली होती. त्यापैकी १.९ कोटी रुपये त्यानं लोकांची मदत करण्यासाठी खर्च केले आणि उर्वरित १७ कोटी रुपये त्याच्या बँक खात्यात आहेत.

“लखनऊमधील एका इन्फ्रास्ट्रक्चर ग्रुपच्या विविध परिसरातीस रिअल इस्टेट प्रोजेक्टमध्ये सोनुनं मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. याठिकणी कर चोरी आणि पुस्तकांमधील अनियमित नोंदीशी संबंधित पुरावे सापडले सापडल्याचा आरोप करण्यात आला आहे.


हेही वाचा

दिवंगत अभिनेते दिलीप कुमार यांचं ट्विटर अकाऊंट होणार बंद

सोनू सूदच्या घरात आयकर विभागाची २० तास झाडाझडती

पुढील बातमी
इतर बातम्या