झी मराठीची 'ती' शीर्षक गीतं पुन्हा ऐकायला मिळणार!

झी मराठी वाहिनी त्यावर दाखवण्यात येणाऱ्या मालिकांच्या लोकप्रियतेमुळे आधीपासूनच प्रेक्षकांची आवडती वाहिनी आहे. आता झी मराठी वाहिनी प्रेक्षकांसाठी घेऊन येतेय खास दिवाळी अंक. ‘उत्सव नात्यांचा’ असं या दिवाळी अंकाचं नाव असून नुकतंच या अंकाचं प्रकाशन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते पार पडलं. 

आजच्या डिजिटल युगात, टीव्हीच्या युगात वाचनसंस्कृती हरवत चालली असल्याचं अनेकजण बोलतात. अशा वेळी झी मराठी दिवाळी अंक घेऊन येत आहे. प्रकाशनाच्या वेळी 'झी मराठीच्या दिवाळी अंकामुळे दिवाळी अंकाला एक वेगळं वलय मिळेल आणि दिवाळी अंकाची परंपरा जपली जाईल. ही परंपरा जपणं आपल्या सगळ्यांसाठीच गरजेचं आहे,' असं मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केलं. 

झी मराठी वहिनीला १८ वर्षे पूर्ण झाली या निमित्ताने आत्तापर्यंत झी मराठी वाहिनीच्या आभाळमाया, वादळवाट अशा गाजलेल्या मालिकांची गीतं प्रेक्षकांच्या ओठांवर रुळलेली आहेत. या प्रत्येक गाण्यामागे एक गोष्ट दडलेली आहे. ती गोष्ट प्रेक्षकांच्या समोर यावी, त्या आठवणींना उजाळा मिळावा या हेतूने यावेळी ‘नक्षत्रांचे देणे’ हा  कार्यक्रम सादर करण्यात आला.

यामध्ये रविंद्र साठे, बेला शेंडे, वैशाली सामंत, स्वप्निल बांदोडकर, माधुरी करमरकर, जान्हवी प्रभू अरोरा, आनंदी जोशी, रोहित राऊत, किर्ती किल्लेदार, सावनी रविंद्र, संदीप उबाळे, जयदीप वागबावकर, मधुरा कुंभार, मंगेश बोरगावकर, प्रविण कुंवर आदी गायकांचा समावेश होता. झी मराठीच्या अठरा वर्षांच्या आठवणींना उजाळा देणारा हा ‘नक्षत्रांचे देणे’ कार्यक्रम येत्या शनिवारी ३० सप्टेंबरला सायंकाळी ७.०० वा. झी मराठीवाहिनीवर पाहता येईल.


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

पुढील बातमी
इतर बातम्या