चला धमाल होऊ द्या !

मुंबई - 'चला हवा येऊ द्या'च्या थुकरटवाडीत या आठवड्यात आंतरमहाविद्यालयीन नाट्य स्पर्धेतून नावारुपाला आलेले कलाकार येणार आहेत. या कलाकारांच्या कारकिर्दीला आकार देण्यात विविध नाट्यस्पर्धेचा मोठा वाटा आहे. संजय मोने,अमृता सुभाष,सिद्धार्थ जाधव,स्पृहा जोशी,प्रियदर्शन जाधव,प्रवीण तरडे,प्रथमेश परब, संगितकार अमितराज,संतोष पवार आदी कलाकार सहभागी झाले होते. या कलाकारांनी आपल्या नाट्यस्पर्धेच्या आठवणी सांगितल्या आणि थुकरटवाडीतील मंडळींसोबत धम्मालसुद्धा केली. यातही सादर करण्यात आलेल्या स्किटमध्ये निलेश साबळेनं केलेली प्रविण तरडेची नक्कल उपस्थितांना खळखळून हसवून गेली. येत्या सोमवारी आणि मंगळवारी रात्री साडे नऊ वाजता झी मराठीवर हे दोन्ही भाग बघायला मिळतील.

पुढील बातमी
इतर बातम्या