कपिल शर्मा छोट्या पडद्यावर करणार कमबॅक, प्रोमो झाला शूट

  • मुंबई लाइव्ह टीम & संचिता ठोसर
  • मनोरंजन

आपल्या कॉमेडीने प्रेक्षकांना नेहमीच खिदळायला लावणारा कपिल शर्मा छोट्या पडद्यावर पुन्हा एकदा दणक्यात कमबॅक करणार आहे. गेलं वर्ष कपिल शर्मासाठी तितकसं चांगलं नव्हतं. सहकलाकरांसोबतच्या वादानंतर छोट्या पडद्यावरील त्याचा कॉमेडीचा शो बंद पडला. यानंतर त्याचा 'फिरंगी' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तितकासा कमाल करू शकला नाही.

कपिलचा हा नवा शो सोनी टीव्हीवरच येत असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. विशेष म्हणजे सोमवारपासून या शोच्या प्रोमेचं शूटही करण्यात आलं. कपिल आणि सोनी यांच्यात या नव्या शोविषयी चर्चाही झाली. साधारण मार्चमध्ये हा शो प्रेक्षकांसमोर येण्याची शक्यता आहे.

सुनील ग्रोवर दिसणार नाही…

कपिलच्या या नवीन शोमध्ये सुनील ग्रोवरच्या चाहत्यांची निराशा होणार आहे. कारण कपिलसोबत झालेल्या वादामुळे सुनील या शोमध्ये सहभागी होणार नाही. मात्र या शोमध्ये अनेक जुने कलाकार दिसणार आहेत. मात्र ते कोण असतील हे अद्याप निश्चित झालेलं नाही. त्याचप्रमाणे काही नवीन कलाकार दिसण्याची शक्यता आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या