लोककलेचे जतन होणे आवश्यक - विनोद तावडे

प्रभादेवी - लोककला ही महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख आहे. परंतु लोककलेचे वास्तव सध्या कमी प्रमाणात रसिकांसमोर येत आहे. त्यामुळे लोप न पावता या ऐतिहासिक लोककलेचे जतन करण्याचे काम राज्य सरकारने हाती घेतले आहे. हे काम आता जवळजवळ 65 टक्के पूर्ण झाले आहे. त्यामुळे युवा पिढीला लोककला म्हणजे काय आणि त्या लोकलेचे महत्व या जतनाच्या कामातून कळू शकेल, असा विश्वास शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केला. राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे दरवर्षी देण्यात येणाऱ्या राज्य सांस्कृतिक पुरस्काराच्या वितरण सोहळ्यात ते बोलत होते. लोककला ही जनमानसात लोकप्रिय असली तरीही अन्य कलेप्रमाणे या लोककलेचा सुयोग्य अभ्यासक्रम दिसत नाही. त्यामुळे लोककला शिकविण्याच्या दृष्टीने नजीकच्या काळात लोककलेचा योग्य अभ्यासक्रम तयार करता येईल का? आणि हा अभ्यासक्रम विविध‍ शिक्षण संस्थांमार्फत शिकवता येईल का? याचा विचारही नजीकच्या काळात राज्य सरकार करेल, असेही तावडे यांनी यावेळी सांगितले. 

शनिवारी प्रभादेवीच्या रविंद्र नाट्यमंदिरच्या प्रांगणामध्ये राज्य सांस्कृतिक पुरस्कार प्रदान सोहळा 2016 हा कार्यक्रम पार पडला. यावेळी संगीत नाटक आकादमी पुरस्कार प्राप्त कलाकारांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता. या सोहळ्यात ऑस्कर सोहळ्यात भारताचे प्रतिनिधीत्व करणारा बाल कलाकार सनी पवार याचा विनोद तावडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नाटक, कंठसंगीत, उपशास्त्रीय संगीत, वाद्य संगीत, मराठी चित्रपट, किर्तन, तमाशा, शाहिरी, नृत्य, लोककला, आदिवासी गिरीजन, कलादान या क्षेत्रात विशेष कामगिरी केलेल्या मान्यवर व्यक्तींना राज्य सांस्कृतिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराचे स्वरुप रुपये एक लाख रोख, मानचिन्ह, मानपत्र, शाल असे होते.

सन 2016-17 चे राज्य सांस्कृतिक पुरस्काराचे मानकरी :


 नाव विभाग
किशोर नांदलस्कर
नाटक
पं. उपेंद्र भट
कंठसंगीत
पं. रमेश कानोले
उपशास्त्रीय संगीत
भालचंद्र कुलकर्णी
मराठी चित्रपट
पांडुरंग जाधव
किर्तन
मधुकर बांते
तमाशा
शाहिरी इंद्रायणी आत्माराम पाटील
शाहिरी
सुखदेव साठे
नृत्य
भागुजी प्रधान
लोककला
सोनू ढवळू म्हसे
आदिवासी गिरीजन
प्रभाकर भावे
कलादान


केंद्रीय संगीत नाटक अकादमी पुरस्काराचे मानकरी:


नाव
विभाग
मनोज जोशी
अभिनय
हिमानी शिवपुरी
अभिनय
प्रदीप मुळ्ये
प्रायोगिक नाट्यकला
छाया खुटेगावकर
लावणी
माया खुटेगावकर
लावणी
शफाअत खान
नाट्यलेखन


पुढील बातमी
इतर बातम्या