आता सिनेमागृहात राष्ट्रगीत दाखवणं बंधनकारक नाही

सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी महत्त्वपूर्ण सुनावणीत देशभरातील सर्व सिनेमागृहात राष्ट्रगीत वाजवणं बंधनकारक नसल्याचा निर्वाळा दिला. सर्वोच्च न्यायालयाने आपल्याच जुन्या निर्णयावर फेरनिर्णय देताना सिनेमागृहात राष्ट्रगीत वाजवणं ऐच्छीक केलं आहे. 

सद्यस्थितीत देशातील प्रत्येक सिनेमागृहात सिनेमा सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत दाखवण्यात येतं. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे सिनेमागृहात राष्ट्रगीत दाखवणं बंधनकारक राहणार नाही.

यापूर्वीचा निर्णय

यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने ३० नोव्हेंबर २०१६ मध्ये देशभरातील सिनेमागृहात सिनेमा सुरू होण्याअगोदर राष्ट्रगीत वाजवणं सक्तीचं केलं होतं. सोबतच जोपर्यंत राष्ट्रगीत सुरू आहे, तोपर्यंत सिनेमागृहात उपस्थित सर्वांनी उभं राहून राष्ट्रगीताचा आदर करावा, असे निर्देशही दिले होते. 

केंद्र सरकारचं प्रतिज्ञापत्र

सिनेमागृहात राष्ट्रगीतावेळी उभं न राहिल्यामुळे प्रेक्षकांमध्ये वादावादीचे प्रकार घडत असल्याने केंद्र सरकारने सोमवारी सर्वोच्च न्यायालयात नवी भूमिका मांडत राष्ट्रगीताबाबत नवे नियम तयार करण्यासाठी मुदत मागितली. तोपर्यंत न्यायालयाने राष्ट्रगीत सक्तीचा निर्णय स्थगित करण्याची विनंती केली होती. पुढील ६ महिन्यांत राष्ट्रगीताचे नवे नियम तयार करण्यात येतील, असं केंद्र सरकारने प्रतिज्ञापत्राद्वारे सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने हा निर्णय दिला.

पुढील बातमी
इतर बातम्या