मुंबई - आतापर्यत चॉकलेट बॉय म्हणून परिचित असलेला स्वप्नील जोशी लवकरच त्याच्या चाहत्यांना ‘स्त्री’ अवतारात पाहायला मिळणार आहे. आगामी ‘फुगे’ सिनेमातील एका सीनसाठी स्वप्नीलने हा अवतार धारण केल्याचं समजतंय. लाल रंगाचा लेडीज टॉप, त्याला साजेशी लिपस्टिक आणि काळे डूलदार कानातले अशा अवतारात स्वप्नील दिसेल.
इंदरराज कपूर प्रस्तुत ‘फुगे या सिनेमातील आपल्या या अवताराबद्दल बोलताना स्वप्नीलने सांगितले की, कोणत्याही अभिनेत्याला आपली कला सादर करण्यासाठी सिनेमाची कथा अधिक महत्वाची असते. जर त्या कथेची
मराठीत 'अशी ही बनवा बनवी’ सिनेमापासून या ट्रेंडला सुरुवात झाली असून, प्रेक्षकांना देखील ते आवडत आहे. माझ्याबद्दल सांगायचं तर यापूर्वी हिंदीच्या कॉमेडी सर्कसमध्ये मी स्त्री पात्र साकारले होते. त्यामुळे मला कठीण गेलं नाही. मात्र, चित्रपटात अशी भूमिका करण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे’, असं देखील स्वप्नीलने सांगितलं.
बॉलीवूडमध्ये अशाप्रकारे नायकाने स्त्रीची वेशभूषा करणं ही काही नवखी गोष्ट नाही. अमिताभ बच्चन, अमीर खान, अजय देवगण, शर्मन जोशी तसेच रितेश देशमुख या हिंदीच्या स्टार नायकांनी देखील स्त्री व्यक्तिरेखा साकारत रसिकांची मने जिंकली आहेत. मराठीतील काही अभिनेत्यांनी देखील अशी 'स्त्री'पात्र वठवली असल्यामुळे आगामी 'फुगे’ या सिनेमातील स्वप्नीलचा हा अंदाज देखील स्वागतार्ह असाच आहे.