१० हजार तासांच्या व्हिडिओतून साकारला 'सचिन'!

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या कारकीर्दीचा आणि प्रवास उलगडणारा ‘सचिन, ए बिलियन ड्रीम्स’ हा चित्रपट 26 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट बनवण्यासाठी संपूर्ण टीमने तब्बल साडेतीन वर्षे मेहनत घेतली आहे. या साडेतीन वर्षांत सचिनच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटना, सामने, खेळी यांच्यावर टीमने विशेष काम केले आहे. मात्र सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा सिनेमा बनवण्यासाठी टीमने सचिनचे तब्बल १० हजार तासांचे व्हिडिओ बघितले आहेत. सचिन कुणाकुणाला भेटतो, सचिनचं खासगी आयुष्य कसं आहे या सगळ्याचा टीममे अभ्यास केला आहे. या चित्रपटात अर्जुन तेंडुलकर हा सचिनच्या लहानपणीची भूमिका साकारणार आहे.

वायुदलातल्या अधिकाऱ्यांसाठी स्पेशल स्क्रिनिंग शो -
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने त्याच्या ‘सचिन ए बिलियन ड्रीम्स’ चित्रपटाचं भारतीय वायुदलातल्या अधिकाऱ्यांसाठी स्पेशल स्क्रीनिंग ठेवलं होतं. सामान्यपणे सेलेब्रिटी स्टार त्यांच्या नव्या चित्रपटाचं पहिलं स्क्रिनिंग बॉलिवूडमधील स्टार्ससाठी करतात. मात्र सचिनने यावेळीही त्याची संवेदनशीलता जपत त्याच्या चित्रपटाचं पहिलं स्क्रीनिंग हवाई दलातल्या अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी केलं.

पुढील बातमी
इतर बातम्या