The Family Man 2 वरून वाद, तामिळनाडूत बंदी

अभिनेता मनोज वाजपेयीची प्रमुख भूमिका असलेली ‘द फॅमिली मॅन 2’ ही वेब सीरिज रिलीजपूर्वीच वादाच्या भोव-यात सापडली आहे. राज्यसभा खासदार वायको यांनी या वेब सीरिजवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

यासाठी त्यांनी माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्रच लिहिले आहे. याआधीही एनटीकेचे संस्थापक सीमन यांनी देखील या सीरिजवर बंदी घालण्याची मागणी केली होती.

त्यापाठोपाठ आता स्वत: तामिळनाडू सरकारनं केंद्र सरकारला अधिकृतपणे पत्र लिहून या वेब सीरिजवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. या वेब सीरिजमध्ये ईलम तमिळला अत्यंत चुकीच्या पद्धतीनं सादर केल्याचा आरोप या पत्रामध्ये करण्यात आला आहे.

श्रीलंकेतील ऐतिहासिक संघर्षात सामील असलेल्या ईलाम तमिळांची विश्वासार्हता संपवण्याचे आणि त्यासंबंधातील तथ्य चुकीच्या पद्धतीनं सादर केलं असल्याचं देखील या पत्रात म्हटलं आहे. 

या सीरिजमध्ये तमिळ बांधवांच्या भावना दुखावल्या असल्याचं कारण दिलं आहे. तमिळनाडू सरकारनं ही वेब सीरिज केवळ तमिळनाडू नाहीतर संपूर्ण देशात प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे.


पुढील बातमी
इतर बातम्या