'ती सध्या काय करते' व्ही.जे.महाविद्यालयात

  • भूषण शिंदे & मुंबई लाइव्ह टीम
  • मनोरंजन

मुलुंड - व्ही. जी. वझे महाविद्यालयात ‘ट्रॅडिशनल डे’ निमित्तानं ‘ती सध्या काय करते’ या सिनेमाची संपुर्ण टीम आली होती. सिनेमाच्या प्रमोशनसाठी टीम महाविद्यालयात आली होती. या वेळी टीमने विद्यार्थ्यांसोबत गप्पा देखील केल्या. लक्ष्मीकांत बेर्डेंचा मुलगा अभिनय बेर्डे या सिनेमातून मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. मराठी सारेगमप लिटील चॅम्प्समधील आर्या आंबेकर सुद्धा या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसंच या सिनेमात अंकुश चौधरी, तेजश्री प्रधान आणि सतीश राजवाडे हे कलाकार देखील सिनेमात दिसणार आहेत. हा चित्रपट प्रेम कथेवर आधारित असणार असल्याचं या वेळी कलाकारांनी सांगितलं.

पुढील बातमी
इतर बातम्या