मनविसेचा दणका, बुक माय शोच्या अॅपवर मराठी पर्याय उपलब्ध!

बुक माय शो च्या अॅप आणि वेबसाईटवर विविध भाषांचा पर्याय उपलब्ध आहे. पण यामध्ये फक्त मराठी भाषेचा पर्याय नव्हता. आता यापुढे मराठी भाषेचा पर्याय देखील उपलब्ध झाला आहे. महाराष्ट्र विद्यार्थी सेना (मनविसे) ने दणका दिल्यानंतर बुक माय शोच्या अॅप आणि संकेतस्थळावर मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध झाला आहे.

बुक मया शो या अॅप आणि वेबसाईटवर मराठी भाषा समाविष्ट करून घेण्यासाठी महाराष्ट्र विद्यार्थी सेना (मनविसे) चे अध्यक्ष आदित्य शिरोडकर आणि चिटणीस साई हरिश्चंद्र आदमाने यांनी त्या कंपनीला निवेदन देत वेळोवेळी पाठपुरावा केला होता. त्यानंतर आता बुक माय शो च्या मोबाईल अॅप आणि वेबसाईटवर मराठी भाषा समाविष्ट करून घेतली.

बुक माय शोच्या कंपनीला २४ तासांचा अवधी देण्यात अाला होता. मनसे नेत्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध करून दिल्याची माहिती बुक माय शोचे व्यवस्थापक अविनाश खन्ना यांनी दिली

मराठी भाषा १२०० वर्ष जुनी आहे. त्याचा आदर आणि मान व्हायलाच हवा.

- संजीव काशीकर, मराठीप्रेमी

पुढील बातमी
इतर बातम्या