अरविंद केजरीवाल यांच्या जीवनावर आधारित 'अॅन इन्सिग्निफिकंट मॅन'चा ट्रेलर लॉन्च!

आम आदमी पार्टीचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर डॉक्युमेंट्री फिल्म येणार असल्याची बऱ्याच दिवसांपासून चर्चा होती. त्या डॉक्युमेंट्री फिल्मचा ट्रेलर नुकताच लाँच झाला आहे. 'अॅन इनसिग्निफिकंट मॅन' असं या डॉक्युमेंट्री फिल्मचं नाव आहे. या डॉक्युमेंट्री फिल्ममध्ये अरविंद केजरीवाल यांच्या सामान्य माणसापासून ते राजकारणातील प्रवास या सगळ्या गोष्टी दाखवण्यात येणार आहेत.

या डॉक्युमेंट्रीतील ट्रेलरची सुरुवात अरविंद केजरीवाल यांच्यापासून होते. ते सुरूवातीलाच आपलं नाव सांगतात आणि मग सिनेमा सुरू होतो. ट्रेलरमध्ये आम आदमी पक्षाच्या स्थापनेपासून ते केजरीवाल यांच्या आयुष्यात आलेल्या राजकारणातील चढ-उतारांचा मागोवा घेण्यात आला आहे. या डॉक्युमेंट्रीत 'स्वराज पार्टी'च्या निर्मितीची प्रक्रियाही दाखविण्यात आली आहे.

विनय शुक्ला आणि खुशबू रांका यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा नॉन फिक्शनल राजकीय चित्रपट असल्याचं म्हटलं जातंय. येत्या १७ नोव्हेंबर रोजी जगभरात हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या