मुंबई - केके मेनन मोठ्या ब्रेकनंतर बॉलिवूड चित्रपटात पुनरागमन करणार आहे. 'द गाजी अटॅक' या चित्रपटात केके प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात केके एका शिख कॅप्टनच्या भूमिकेत दिसणार आहे.
'द गाजी अटॅक' हा सिनेमा भारतात पहिल्यांदा झालेल्या सागरी युद्धावर आधारीत आहे. हा सिनेमा एक नौदल अधिकारी आणि त्याच्या टीमची कथा सांगणारा आहे. या टीमने कशा प्रकारे 18 दिवस पाण्याखाली घालवले याची चित्तथरारक कथा या सिनेमात दाखवण्यात येणार आहे.
निर्माता करण जोहरने एए फिल्म्स यांच्यासोबत या सिनेमाची निर्मिती केली आहे. धर्मा प्रोडक्शन या बॅनर अंतर्गत बनणारा हा सिनेमा १७ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. सिनेमाचं दिग्दर्शन देबुकांत संकल्प रेड्डी यांनी केलं आहे. या सिनेमात राणा डग्गुबत्ती, तापसी पन्नु, के. के. मेनन आणि अतुल कुलकर्णी यांच्या मुख्य भूमिका आहेत.