जय जय महाराष्ट्र गाण्याचं गुजराती व्हर्जन आहे का हो?

  • मुंबई लाइव्ह टीम & संचिता ठोसर
  • मनोरंजन

अर्थसंकल्पीय अधिवेशनाला राज्यपाल विद्यासागर राव यांचं अभिभाषण मराठीऐवजी गुजराती भाषेत ऐकू आलं. यामुळे विरोधकांनी विधीमंडळात गदारोळ घातला. जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे अधिवेशनाचा पहिलाच दिवस वादळी ठरला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याविषयी माफीही मागितली. या सगळ्या वादावर आता दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनीही प्रश्न उपस्थित केला आहे.

महेश मांजरेकरांचं ट्वीट

'जय जय महाराष्ट्र माझा या गाण्याचं गुजराती व्हर्जन उपलब्ध आहे का?' असा प्रश्न महेश मांजरेकर यांनी ट्वीटरवरून विचारला आहे.

महेश मांजरेकरांनी केलेल्या या ट्वीटवर अनेकांनी रिप्लाय दिले आहेत. अनेकांनी या गाण्याचं गुजराती ट्रान्सलेशन देखील पोस्ट केलं आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या