महाराष्ट्र शासनाचा जीवनगौरव पुरस्कार सोहळा

चर्चगेट - भविष्यात मंत्री असलो किंवा नसलो तरी किमान एका मराठी नाटकाचे लंडनमध्ये स्वखर्चाने प्रयोग करेन, अशी घोषणा महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी केली आहे. महाराष्ट्र राज्य सांस्कृृतिक विभाग संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर स्मृती पुरस्कार आणि नटवर्य प्रभाकर पणशीकर स्मृती जीवनगौरव पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते.

मरिन लाइन्समधल्या एसएनडीटी महाविद्यालयाच्या पाटकर सभागृहात साजरा झालेल्या सोहळ्याचे सत्कारमूर्ती होते चंद्रकांत उर्फ चंदु डेगवेकर आणि लिलाधर कांबळी. हे मराठी रंगभूमी गाजवणारे दिग्गज.

चंद्रकांत डेगवेकर यांना संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर जीवनगौरव पुरस्काराने तर नटवर्य प्रभाकर पणशीकर स्मृती जीवनगौरव पुरस्काराने लिलाधर कांबळी यांना गौरवण्यात आलं. कार्यक्रमात जय जय गौरी शंकर या चंद्रकांत डेगवेकर यांच्या संगीतनाटकाची चित्रफीत दाखवण्यात आली. तर 'प्रेमा तुझा रंग कसा' या लिलाधर कांबळी यांच्या नाटकाची इंग्रजी अनुवादीत चित्रफीत सुद्धा दाखवण्यात आली. तसंच लिलाधर कांबळी यांनी विद्याधर गोखले यांच्या साथीने कशाप्रकारे यशाची शिखरे पार केली याची आठवण करण्यात आली. तर, सोहळ्यात नाट्यसंमेलनाध्यक्ष गंगाराम गवाणकर देखील उपस्थित होते.

पुढील बातमी
इतर बातम्या