नोकरी वाचवण्यासाठी सुरक्षारक्षकांचं आंदोलन

  • संतोष मोरे & मुंबई लाइव्ह टीम
  • मनोरंजन

आझाद मैदान - नोकरी धोक्यात आलेल्या 65 सुरक्षा रक्षकांनी आझाद मैदानावर धरणं आंदोलन केलं. चित्रपट महामंडळ, गोरेगाव येथे कार्यरत असणाऱ्या 65 सुरक्षा रक्षकांना 1 नोव्हेंबरपासून नोकरी गमवावी लागणार आहे. त्यांच्याऐवजी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ 2010 च्या अधिनियमानुसार सुरक्षा बलातल्या रक्षकांची नेमणूक होणार आहे. त्यामुळे त्यांच्या नोकरीचा प्रश्न निर्माण झालाय. सुरक्षा रक्षकांना महामंडळामध्ये समाविष्ट करा, सरकारी वेतनश्रेणी लागू करा, तसंच महामंडळाच्या सुरक्षा बलाच्या सुरक्षा रक्षकांची नेमणूक करू नका आदी मागण्या या धरणं आंदोलनात करण्यात आल्या. महाराष्ट्र सुरक्षा रक्षक आघाडीचे अध्यक्ष कॉ. उदय भट, सरचिटणीस कॉ. दत्तात्रय अत्याळकर यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं.

पुढील बातमी
इतर बातम्या