Year End 2020 : २०२० वर्षातील महिलांची यशोगाथा मांडणारे चित्रपट

01/7
कौटुंबिक हिंसाचार आणि स्त्री-पुरुषांतील गुंतागुंतीचे नातेसंबंध या दोन्ही संकल्पना यात मांडण्यात आली आहे. तापसी पन्नू, पावैल गुलाटी, रत्ना पाठक शाह, कुमूद मिश्रा, माया सराओ, तन्वी आझमी, गीतिका विद्या, मानव कौल यांच्या प्रमुख भूमिका यात आहेत.
02/7
विद्या बालनची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट ह्यूमन-कॉम्प्यूटर शकुंतला देवीवर आधारीत होता. अनु मेनन दिग्दर्शित या चित्रपटात सान्या मल्होत्रा यांनीही मुख्य भूमिका साकारली आहे. विद्यानं तिच्या अभिनय कौशल्यानं प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवलं.
03/7
अश्विनी अय्यर तिवारी दिग्दर्शित स्पोर्ट्स वर आधारीत चित्रपटात कंगना रणौत मुख्य भूमिकेत आहे. एका माजी कबड्डीपटूची कथा आहे जी तिच्या मध्यमवर्गीय कुटुंबाचा सांभाळ करताना तिला आवडलेल्या खेळामध्ये पुनरागमन करण्यासाठी धडपडत आहे. २४ जानेवारीत हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.
04/7
मेघना गुलजार दिग्दर्शित, छपाक १० जानेवारी रोजी रिलीज झाला होता. अॅहसिड हल्ल्यातील वाचलेल्या लक्ष्मी अग्रवालच्या जीवनावर चित्रपट आधारित होता. दीपिका पदुकोणनं लक्ष्मीची भूमिका साकारली होती. याशिवाय विक्रांत मॅसी दीपिकाच्या विरुद्ध मुख्य भूमिकेत दिसला आहे.
05/7
वयाच्या चोविसाव्या वर्षी कारगिलच्या युद्धभूमीवर कर्तृत्व गाजवणा-या गुंजन सक्सेना यांची प्रेणादायी गोष्ट दिग्दर्शक शरण शर्मानं सिनेमातून मांडली आहे. जान्हवी कपूर,पंकज त्रिसपाठी,अंगद बेदी,विनीत कुमार सिंह,मानव विज,मनीष वर्मा,आयशा रज़ा मिश्रा यांच्या प्रमुख भूमिका यात आहेत. Gunjan showed that courage, grit, stamina, strength, doesn’t come bundled with the concept of masculinity. That itself was such a breath of fresh air! However, there was a lot of controversy over the film portraying false scenes about ill-treatment of females in the Air Force.
06/7
हुसेन जैदी यांच्या मुंबईच्या माफिया क्वीन्स या कादंबरीवर आधारित, आलिया भट्ट स्टारर गंगूबाई काठियावाडी हा संजय लीला भन्साळी दिग्दर्शित आहेत. ‘कामठीपुराची मॅडम’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गंगूबाई कोठेवाली ६० च्या दशकात एक वेश्यागृहाची मालकिण होती. हा चित्रपट यावर्षी सप्टेंबरमध्ये प्रदर्शित होणार होता. परंतु साथीच्या आजारामुळे पुढे ढकलण्यात आला आहे.
07/7
तमिलनाडुच्या चौदा वर्षांहून अधिक काळ मुख्यमंत्री म्हणून काम करणाऱ्या जयललिता यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. कंगना रणौत यात मुख्य भूमिकेत आहे.
पुढील बातमी
इतर बातम्या