वर्ल्ड टेलिव्हिजन डे

मुंबई - २१ नोव्हेंबर म्हणजेच सोमवारी वर्ल्ड टेलीव्हीजन डे. एवढ्या वर्षात टेलीव्हीजनचं स्वरूप बरंच बदललं. 90 वर्षांपूर्वी हलती चित्रे दाखवण्याचा शोध दूरचित्रवाणीनं लावला. ब्लॅक अँड व्हाइट असणारा दूरचित्रवाणी संच कालांतरानं रंगीत चलचित्र दाखवू लागला. तेव्हापासून आजपर्यंत दूरचित्रवाणीनं घरातच नव्हे तर मनातही कायमचं स्थान मिळवलंय. पण कालांतरानं देशाच्या प्रसारण सेवेत खासगी वाहिन्यांनी प्रवेश केला. बदलत्या काळानुसार प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावल्या. मॉडर्न टेक्‍नॉलॉजीच्या साथीनं त्या अपेक्षा पूर्णही झाल्या. पण त्यासाठी टेलिव्हिजन क्षेत्रात स्पर्धा सुरू झाली. डायरेक्‍ट टू होम किंवा व्हिडिओ ऑन डीमांडसारख्या सेवांनी प्रसारण क्षेत्रात क्रांती केली. ऐवढच काय दिवसरात्र मुलं फक्त टी.व्ही. पाहतात असी बोंब पालक नेहमीच करतात. पण आता टीव्ही म्हणजे मुलांसाठी इंटरॅक्‍टिव्ह सेशन्समधून शिक्षणाचे धडे मिळू लागलेत. असं म्हणतात की टेलिव्हीजनच्या विकासाची सरुवात 1830 साली झाली. ग्राहम बेल आणि थॉमस एडिसन ने आवाज आणि फोटोला ट्रान्सफ करून दाखवल. त्यानंतर पॉल निप्को रोटेटींग डिस्क हे मॅकेनिकल स्कॅनर बनवणारे पहिले व्यक्ती होते. 15 सष्टेंबर 1959 साली टीव्ही दिल्लीत सुरू झाला. त्यानंतर 1972 मध्ये मुंबई आणि अमृतसर मध्ये दाखल झाला.

पुढील बातमी
इतर बातम्या