भारतातील सगळ्यात मोठा डिजीटल एंटरटेन्मेंट झी फाईव्ह ने ZEE5 ORIGINALS लॉन्च करण्याचा निर्णय घेतला आहे. झी फाईव्ह ग्लोबलचे सीईओ अमित गोयंका यांनी याची घोषणा कोली. ZEE5 ORIGINALS हे अॅप सुरूवात करून त्यांनी मोबाईल इन्टरटेन्मेंटच्या जगात प्रवेश केला आहे.
ZEE5 ORIGINALS वर २० एप्रिल २०१८ पर्यंत २० नवीन प्रयोग केले जाणार आहेत. यात शॉर्ट फिल्म, वेब सिरीज, अॅक्शन, सस्पेन्स, थ्रिलर, कॉमेडी, बायोपिक अशा असंख्य गोष्टी बघता येणार आहेत. हे केवळ एका भाषेत नाही, तर हिंदी, मराठी, तेलगू, तमिळ, मल्याळम आणि बंगाली अशा भाषांमध्ये हे सगळे कार्यक्रम बघता येणार आहेत. त्याचप्रमाणे प्रेक्षकांना प्रत्येक महिन्याला नवीन शॉर्ट फिल्म बघता येणार आहे. जी सहा भाषांमध्ये प्रसारीत होणार आहे.
मराठी प्रेक्षकांसाठी खास आकर्षण
मराठी प्रेक्षकांसाठी खास 'हॉर्न ओके प्लीज' आणि 'लिफ्ट मॅन' अशा २ नवीन वेबसिरीज सुरू करण्यात येणार आहेत. 'हॉर्न ओके प्लीज' या वेबसिरीजमध्ये इशा केसकर दिसणार आहे. अद्वीक आणि गायत्रीची ही स्टोरी आहे. 'हॉर्न ओके प्लीज' ही स्टोरी आजच्या तरूणाईची कथा आहे. तर लिफ्ट मॅन या वेबसिरीजमधून भाऊ कदम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.