राज्यात अतिवृष्टीमुळं ३०० जणांचा मृत्यू

राज्यात अतिवृष्टीमुळं आणि पुरामुळे आतापर्यंत ३०० लोकांचा मृत्यू झाला आहे. तर  १०० जखमींवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. रायगड, रत्नागिरी आणि पश्चिम महाराष्ट्रात पडलेल्या मुसळधार पावसामुळे दरडी कोसळणे, भूस्खलन आदी घटना घडल्या. अनेक ठिकाणी पूर आले. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. 

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात २२ ते २४ जुलैदरम्यान अतिवृष्टी झाली. अतिवृष्टीमुळे कोकणातील १२०५ गावांना फटका बसला असून,तेथील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यास अतिवृष्टी तसेच पुराचा मोठा फटका बसला. रायगड आणि सातारा जिल्ह्यात दरडी कोसळून ७० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. सध्या या जिल्ह्यातील पाऊस कमी झाला आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरही ओसरू लागला आहे.

राज्य आपत्ती निवारण नियंत्रण कक्षाच्या माहितीनुसार, अतिवृष्टीचा फटका २५५६ गावांना बसला आहे. त्यामध्ये कोल्हापूर जिल्हयातील ४११, सांगली १०४, सातारा ४१६, पुणे ४२०, रत्नागिरी ४८२, पालघर ३९६, रायगड २८५ गावांचा समावेश आहे.  दरडी कोसळून तसेच पुरामुळे २१३ लोकांचा मृत्यू झाला असून  ७४२ जनावरे आणि ६२ हजार कोंबड्यांचा मृत्यू झाला. कोकणात आठ हजार २६७ हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले आहे. तर ३२७४ घरांचे नुकसान झाले आहे. 

पुढील बातमी
इतर बातम्या