भाईंदर खाडीजवळ 7 फुटांचा डॉल्फिन आढळला मृतावस्थेत

बुधवारी भाईंदर येथील जसलपार्क जवळील खाडीच्या किनारी 7 फूट लांबीचा डॉल्फिन मृतावस्थेत आढळून आला. हा डॉल्फिन दोन बोटींच्या मध्ये आढळून आला. त्याच्या तोंडाला जखम झाल्याने रक्तस्त्राव होत होता.

वनविभागाला दिली माहिती

मंगळवारी मध्यरात्री एक वाजेच्या दरम्यान खाडीत जाळी टाकण्यासाठी गेलेल्या मच्छीमारांना एका मोठ्या माशाची चाहूल लागली. याचवेळी हा डॉल्फिन किनाऱ्यावर नांगरलेल्या बोटीला आदळला. मच्छीमारांनी यासंदर्भात वनविभाला कळवल्यानंतर डॉल्फिनला खाडीच्या किनारी दफन केलं.

मृत डॉल्फिनच्या संख्येत वाढ

गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि रायगड या ठिकाणी डॉल्फिन मृतावस्थेत आढळण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. तीन महीन्यांपूर्वी वर्सोवा समुद्र किनारी पांच फूट लांबीचा इंडो-पॅसिफिक हंपबॅक डॉल्फिन मृतावस्थेत आढळून आला होता. तर दोन महिन्यापूर्वी गिरगांव चौपाटीच्या किनारी एक आठ फूट लांबीचा हंपबॅक डॉल्फिन मृतावस्थेत आढळून आला होता.

पुढील बातमी
इतर बातम्या