मलबार हिल - पाच दशकांच्या कलाप्रवासात अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक, पार्श्वगायक, उत्तम नर्तक अशा विविधांगी भूमिकांमधून रसिकांचं मनोरंजन करणाऱ्या सचिन पिळगावकर यांना त्यांच्या रुपेरी पडद्यावरील प्रदीर्घ कामगिरीबद्दल जीवनगौरव पुरस्कार 2017 ने गौरवण्यात येणार आहे.
मराठी, हिंदी, गुजराती कलाविश्व गाजवणारे मराठी मातीतले कलावंत सचिन पिळगावकर यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान आणि मराठी गीत-नृत्यांच्या कार्यक्रमाचं आयोजन हा आग्रह करणारे मलबार हिलमधील बहुतांश ज्येष्ठ नागरिक मराठीप्रेमी गुजरातीभाषिक आहेत, हे महत्त्वाचं. या सोहळ्याचं आयोजन मलबार हिल सिटीझन्स फोरम यांच्या वतीने किसन जाधव आणि सुशिबेन शाह यांनी केलं आहे.