विसर्जनात चौपाटीवर जेलीफिशचा धोका

  • जयाज्योती पेडणेकर & मुंबई लाइव्ह टीम
  • पर्यावरण

ऐन गणेशोत्सवाच्या काळात मुंबईतील दादर चौपाटी आणि मालाडच्या आक्सा समुद्र किनाऱ्यावर जेलीफिश अवतरल्या आहेत. आज पाच दिवसांच्या घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन होणार आहे. त्यामुळे शक्यतो गणेशभक्तांनी पाण्यात उघडया पायाने उतरु नये. जेलीफिशने दंश केल्यास समुद्रावर तैनात असलेल्या वैदयकीय डॉक्टरांकडे प्राथमिक उपचार करावे. पालिकेने तैनात केलेल्या बोटीने जीवरक्षकांच्या सहाय्याने गणपतींचे विसर्जन करावे असं आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे. 2013 - 2014 साली गिरगाव आणि जुहू चौपाटीवर दीड दिवसांच्या गणपतींच्या विसर्जनावेळी गणेशभक्तांना जेलीफिशने दंश केल्याची घटना घडली होती. त्यामुळे खबरदारी म्हणून पालिकेने समुद्रात बोटी आणि जीवरक्षक नेमले आहेत. तसेच लहान मुलांना समुद्रात न उतरण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.  

पुढील बातमी
इतर बातम्या