लॉकडाऊन असूनही आवाजाची पातळी 'या' शहरांमध्ये सर्वाधिक

२०२० मध्ये मोठ्या शहरात वाहतुकीत मोठी घट दिसून आली. त्यामुळे संपूर्ण शहर शांत झाले. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं (CPCB) राज्यसभेला सादर केलेल्या आकडेवारीवरून बेंगळुरू, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, कोलकाता, लखनौ, तसंच मुंबईमधील हवामानाची पातळी मर्यादेपेक्षा अधिक दिसून आली.

हैदराबादच्या कुकतपल्ली इथं दिवसातील सरासरी ध्वनी पातळी (पहाटे ६ ते १० पर्यंत) ७७ डेसिबल (डीबी) नोंदवली गेली. दरम्यान, सर्वात जास्त रात्रीची आवाज पातळी (रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत) ७३ अनुक्रमे दिल्ली, चेन्नई आणि हैदराबाद इथं नोंदवली गेली.

ध्वनी प्रदूषण (नियमन आणि नियंत्रण) नियम २००० नुसार निवासी, व्यावसायिक आणि औद्योगिक क्षेत्रातील जास्तीत जास्त आवाजाची पातळी दिवसाच्या वेळी ५०, ५५, ६५ आणि ७५ डीबी पर्यंत नोंदवली गेली. तर रात्रीच्या वेळी ४०, ४५, ५५ आणि ७० अशी नोंदवली गेली.

दिवसा अंधेरी आणि सीएसएमटीमध्ये ७२ डीबीचा सर्वाधिक आवाज आहे. रात्रीच्या वेळी होणार्‍या आवाजाच्या बाबतीत अंधेरी देखील अव्वल स्थानी आहे. हे दर्शवण्यासारखे आहे की सीएसएमटी ध्वनी मॉनिटरिंग स्टेशन व्यावसायिक श्रेणीत येते तर अंधेरी स्टेशन औद्योगिक स्थान म्हणून वर्गीकृत केली जाते.

आवाज फाऊंडेशनच्या संयोजक सुमैरा अब्दुलाली म्हणाल्या, “२०२० मध्ये शहर शांत होते. जास्त आवाज नेहमी वाहनांचा असल्याचा समजला जातो. डेटा दर्शवितो की लॉकडाउन चालू असतानाही पातळी अनुज्ञेय मर्यादेपेक्षा जास्त राहिली आहे. दिवसरात्र ध्वनी प्रदूषण निर्माण करणाऱ्या बांधकामांबाबत लॉकडाऊन दरम्यान आम्हाला अनेक तक्रारी आल्या.”

मार्च २०२० पासून मुंबईतील कित्येक भागात लॉकडाऊन असूनही वाहतूक कधीच ठप्प झाली नाही. तथापि, तज्ञांनी असं सांगितलं आहे की, लॉकडाउन दरम्यान शहरातील वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात कमी झाले.


हेही वाचा

मुंबईत मार्च महिन्यात विक्रमी तापमान

पुढील बातमी
इतर बातम्या