'...यावर तोडगा काढा'

  • भारती बारस्कर & मुंबई लाइव्ह टीम
  • पर्यावरण

धारावी - संत कक्कया मार्ग आणि संत रोहिदास मार्गवरील कच्चे रस्ते, ठिकठिकाणी पडलेले खड्डे आणि दिवसभर उडणारी धूळ यामुळे धारावीकर हैराण झालेत. रस्त्यावरील भरधाव वाहनांमुळे उडणाऱ्या धुळीनं इथल्या रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झालाय. परिणामी रस्त्यालगत राहणाऱ्या अनेकांना दमा, खोकला, डोकेदुखी, सर्दी आणि श्वसनाच्या आजारांनी ग्रासलंय.

या समस्येबाबत धारावी नागरिक कृती समितीनं स्वाक्षरी मोहीम राबवली. यासंदर्भातील निवेदन 19 नोव्हेंबरला पालिकेच्या जी- उत्तर विभागाला दिलं होतं. मात्र आजपर्यंत पालिकेनं दखल घेतलेली नाही. "यावर वेळीच तोडगा काढला नाहीतर जनआंदोलन करू," असा इशारा धारावीच्या नागरिक समितीचे प्रतिनिधी दिलीप गाडेकर यांनी दिलाय.

पुढील बातमी
इतर बातम्या