इको फ्रेंडली दिवाळी

  • श्रद्धा चव्हाण & मुंबई लाइव्ह टीम
  • पर्यावरण

गोरेगाव - बिंबिसारनगर मैत्री सोसायटीत गेल्या ४ वर्षांपासून संवाद युवा संचच्या वतीनं इको फ्रेंडली दिवाळी साजरी केली जाते. याठिकाणी फुलांची,रंगाची,टाकाऊ कागदाची रांगोळी काढली जाते. किल्ले बनवले जातात. त्याबरोबर पहिल्या दिवशी दिपमहोत्सव साजरा केला जातो. त्यानंतर एकत्र बसून फराळ करण्यात येतो. लहान मुलांसाठी चित्रकला, पणती सजवणे यांसारख्या स्पर्धाही घेतल्या जातात. याबाबत युवा संचाचे अध्यक्ष अनिरुद्ध हळबे यांना विचारलं असता गेले ४ वर्षांपासून इको फ्रेंडली दिवाळी साजरी करत असल्याचं, तसंच प्रदूषण होऊ नये म्हणून प्रयत्नशील असल्याचं सांगितलं.

पुढील बातमी
इतर बातम्या