वर्षातलं शेवटचं सूर्यग्रहण, पण भारतात...

कोरोना काळात यंदाचं शेवटचं २०२० या वर्षांतलं शेवटचं सूर्यग्रहण आहे. हे ग्रहण भारतातून दिसणार नाही. सूर्यग्रहण बहुतेक दक्षिण अमेरिकेतून दिसेल. या ग्रहणात चंद्र सूर्याला पूर्णपणे व्यापून टाकणार आहे. तर सूर्य चंद्राच्या एकाच दिशेला किंवा भागाला कव्हर करणार आहे. २०२१ मध्ये दोन सूर्यग्रहण दिसणार आहेत.

भारतात हे सूर्यग्रहण दिसणार नाही. तर भारताबाहेरच्या देशांमध्ये दिसणार आहे. भारतीय वेळेनुसार हे ग्रहण संध्याकाळी ७ वाजून ३ मिनिटांनी सुरू होईल. तर रात्री १२ वाजता संपणार आहे. साधारण ५ तासांचं हे ग्रहण असणार आहे.

संध्याकाळी उशीरा असल्यानं सूर्य ग्रह सोमवारी भारतात दिसणार नाही. संपूर्ण सूर्यग्रहण दक्षिण अमेरिकेत चिली आणि अर्जेंटिनाच्या काही भागांतून सर्वोत्तम दिसेल. चंद्रामुळे सूर्य झाकला जातो म्हणून चिली आणि अर्जेंटिनामध्ये काळोख होणार आहे. अमेरिकेच्या दक्षिण भाग, नैऋत्य आफ्रिका आणि अंटार्क्टिका येथे काही अंशी सूर्यग्रहण दिसणार आहे. अमेरिकेची अंतराळ संस्था नासा लोकांना हे ग्रहण पाहण्यासाठी त्यांची लिंक देखील देणार आहे.


पुढील बातमी
इतर बातम्या