पर्यावरणासाठी जनजागृती

फोर्ट - सर.जे.जे गर्ल हायस्कूलमध्ये सार्प या स्वयंसेवी संस्थेकडून वन्यजीव आणि पर्यावरण जनजागृतीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. विदयार्थ्यांना पर्यावरणाविषयी गोडी निर्माण व्हावी आणि विदयार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्व पटावे या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला होता. कार्यक्रमात सर जे. जे.स्कूलच्या 8 वी इयत्तेच्या 56 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. दिवसेंदिवस वाढत असलेली ग्लोबल वॉर्मिंग, सापांचे प्रकार, फुलपाखरांविषयी माहिती तसेच पर्यावरणाचे महत्त्व सार्पच्या स्वयंसेवकांनी विदयार्थ्यांना दिले. तसेच विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांचे यावेळी निरसरण करण्यात आले. विद्यार्थ्यांना पर्यावरणाविषयी आवड निर्माण व्हावी, याच या उपक्रमाचा मुख्य हेतू असल्याचं सार्पचे संस्थापक सुनील शिंदे यांनी सांगितले.

पुढील बातमी
इतर बातम्या