खूशखबर! मुंबईत मान्सूनचं अागमन वेळेवरच

  • मुंबई लाइव्ह टीम & राजश्री पतंगे
  • पर्यावरण

उन्हाच्या तडाख्यानं हैराण झालेल्या मुंबईकरांसाठी एक खूशखबर आहे. लवकरच त्यांना दिलासा मिळण्याची शक्यता अाहे. ज्यांची मुंबईकरांना अातुरता लागून राहिली अाहे, त्या पावसाचं यंदा मुंबईत आगमन वेळेवरच होणार आहे. कारण यंदा २८ मे रोजी केरळमध्ये पावसाचं आगमन होणार असून त्यानंतर एका आठवड्यात तो मुंबईत दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.

हवामान खात्याचा अंदाज

खरंतर दरवर्षी केरळात १ जूनला पावसाचं आगमन होतं. देशाच्या उत्तरेच्या बाजूने तो कसा पुढे सरकतो, यावर मान्सूनची प्रगती ठरते. मान्सूनचा पुर्वेकडील भाग ज्यावेळी ईशान्य भारतात असतो, त्यावेळी म्हणजे साधारण आठवड्याभरात पाऊस मुंबईत दाखल झालेला असतो. त्यामुळे मान्सून यंदा वेळेतच दाखल होणार, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवला जात आहे.

यंदा पावसाचं प्रमाण किती?

मान्सून केरळमध्ये साधारण २८ मेपर्यंत दाखल होणार असल्याचा अंदाज अाहे. यंदा पाऊस सामान्य राहील अशी शक्यता भारतीय हवामान खात्यानं (आयएमडी) वर्तवली आहे. यंदा पावसाचं प्रमाण साधारणत: ४२ टक्के असेल आणि सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता १२ टक्के असेल, असंही हवामान खात्याने म्हटलं आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या