23 जुलैपासून चार दिवस महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज

राज्यातील पावसाचा जोर काही प्रमाणात कमी झाला आहे. गेल्या आठवड्यात राज्यात जोरदार पाऊस झाला होता. तसंच पुढील चार दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे.

राज्यात मुंबई, कोकण, नाशिक आणि मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. रविवारी आणि सोमवारी मराठवाड्यातील जालना, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता आहे.

गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पडलेल्या दमदार पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. मात्र उद्यापासून मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

मोडकसागर, तानसा, तुळशी धरणही ओव्हरफ्लो झाले आहेत. मध्य वैतरणा धरणापूर्वी मोडकसागर, तानसा आणि तुळशी धरणही ओव्हरफ्लो झाले आहे. 13 जुलै रोजी मोडकसागर, 14 जुलै रोजी तानसा आणि 16 जुलै रोजी तुळशी जलाशय ओव्हरफ्लो झाला. 19 जुलैच्या मध्यापर्यंत वैतरणाही ओसंडून वाहू लागला. आता मुंबईकरांसमोरील पाण्याचे संकट जवळपास संपले आहे. 

पुढील बातमी
इतर बातम्या