मुंबई आणि उपनगरात आज मुसळधार पावसाची शक्यता

IMD च्या प्रादेशिक हवामान केंद्राच्या 7 जुलै, शुक्रवारच्या अंदाजानुसार, शहरात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 8 जुलैच्या अंदाजातही मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज आहे. रविवार आणि सोमवारी (9 आणि 10 जुलै) पाऊस मध्यम असेल.

राज्यामध्ये जुलैमध्ये सरासरीइतका पाऊस पडण्याची माहिती भारतीय हवामान विभागातर्फे देण्यात आली आहे.

राज्यामध्ये सध्या ३० टक्के पावसाची तूट आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पालघर जिल्ह्यामध्ये अतिरिक्त पावसाची नोंद आहे. तर मुंबई उपनगर, रायगड, ठाणे, नाशिक, नंदुरबार, लातूर, भंडारा, गोंदिया येथे पाऊस सरासरीच्या श्रेणीत आहे.

भारतीय हवामान विभागाने गुरुवारी ६ जुलै रोजी जारी केलेल्या पुढील चार आठवड्याच्या पूर्वानुमानानुसार ७ ते १३ जुलै, १४ जुलै ते २० जुलै, २१ जुलै ते २७ जुलै या काळात कोकणामध्ये चांगला पाऊस असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

७ ते १३ जुलै या आठवड्यात मध्य महाराष्ट्रामध्ये तसेच विदर्भात काही ठिकाणी पाऊस अनुभवता येईल. मात्र १४ ते २० जुलै या कालावधीत बहुतांश महाराष्ट्रात फारसा पाऊस नसेल असे आत्ताच्या पूर्वानुमानावरून स्पष्ट होत आहे.

२१ ते २७ जुलैच्या आठवड्यात मात्र पूर्ण राज्यात पावसाचे अस्तित्व असू शकेल. त्यानंतर २८ जुलै ते ३ ऑगस्ट या आठवड्यात पुन्हा एकदा पावसाचे प्रमाण खालावण्याची शक्यता आहे. या काळात कोकणात पाऊस पडू शकेल.


पुढील बातमी
इतर बातम्या