महाराष्ट्रात यलो अलर्ट जाहीर

महाराष्ट्रात सध्या हवामानाचे वेगळे पॅर्टन दिसत आहेत. काही भागात अवकाळी पाऊस तर काही भागात तीव्र उष्णतेची लाट अनुभवायला मिळत आहे. India Meteorological Department (IMD) ने कोकण, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.

हवामान खात्याच्या माहितीनुसार, प्री-मॉन्सून अ‍ॅक्टिव्हिटीमुळे अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना, वीजा, जोरदार वारे आणि काही ठिकाणी गारपीट होत आहे. मुंबईसह कोकण पट्ट्यात पुढील काही दिवस उष्ण आणि दमट हवामानासोबत मधूनमधून पावसाची शक्यता आहे.

मराठवाड्यात तापमान 38°C ते 42°C दरम्यान कायम असून, त्याचवेळी पावसाची व वादळी वाऱ्यांची शक्यता असल्यामुळे शेती पिकांना नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, विदर्भात तीव्र उष्णतेची लाट सुरू असून काही भागात तापमान 44–45°C पर्यंत पोहोचले आहे. या भागात होणारा पाऊस हा केवळ तात्पुरता दिलासा देणारा ठरेल, असेही हवामान खात्याने सांगितले आहे.

IMD च्या इशाऱ्यानुसार, पुढील काही दिवस राज्यात असे बदलते हवामान कायम राहण्याची शक्यता आहे.


पुढील बातमी
इतर बातम्या