मुंबईत येत्या शनिवारी पावसाची शक्यता

(Representational Image)
(Representational Image)

मुंबईसह राज्याच्या अनेक भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या शनिवारी पुन्हा एकदा मुंबईत पाऊस हजेरी लावणार आहे. शनिवारी मुंबईत मेघगर्जनेसह हलक्या सरी बरसू शकतात अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

मुंबईच्या किमान तापमानात देखील घट होऊ शकते. मुंबईसह महाराष्ट्रात ९ जानेवारीला देखील अवकाळी पाऊस पडला होता. वाऱ्याच्या दिशेत झालेला बदल, अरबी समुद्रातील आर्द्रता यामुळे मुंबईत पावसाने शिडकावा केला होता. 

त्यावेळी मुंबईतील किमान तापमान हे १३.२ अंश सेल्सियसपर्यंत खाली आले होते. त्यानंतर आता पुन्हा नैऋत्य राजस्थानजवळ वादळासारखी परिस्थिती निर्माण झाल्याने मुंबईत पाऊस पडू शकतो. या बदलांमुळे मुंबईचे रात्रीचे तापमान देखील गेल्या काही दिवसांपासून घसरत आहे.

बुधवारी रात्री मुंबई किमान तापमान कुलाबा वेधशाळेने २० अंश सेल्सियस तर सांताक्रूझ वेधशाळेने १७.३ अंश सेल्सियस नोंदवले आहे. दरम्यान दिवसाचे तापमान कुलाबा वेधशाळेने २९ अंश सेल्सियस तर सांताक्रूझ वेधशाळेने ३१.३ अंश सेल्सियस नोंदवलेले.

पुढील बातमी
इतर बातम्या