वृक्ष लागवड मोहिमेची लिम्का बुकमध्ये नोंद

मुंबई - महाराष्ट्रातील वृक्ष लागवड मोहिमेची लिमका बुक ऑफ रेकॉर्डने दखल घेतलीय. संपूर्ण राज्‍यात 1 जुलै 2016 रोजी 2 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्‍प वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला होता. त्याला राज्यातील जनतेनेही चांगला प्रतिसाद दिला. या अंतर्रगत राज्‍यात 2 कोटी 81 लक्ष 38 हजार 634 वृक्षरोपण झाले. महाराष्‍ट्राच्‍या वनविभागाने वृक्ष लागवडीसंदर्भात नव्‍या विक्रमाची नोंद केली. या विक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डने केली आहे.

'लिम्का बूक ऑफ रेकॉर्ड'चे प्रमाणपत्र हे रविवारी देण्यात आले. तसंच रविवारीच ज्युनिअर चेंबर इंटरनॅशनल मरीन लाईन्सच्या वतीने सुधीर मुनगंटीवार यांना मॅन ऑफ द ईयर पुरस्काराने गौरवण्यात आलं. पदमविभूषण डॉ. बी. के गोयल यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. या दोन्ही गोष्टी खूप आनंददायी असल्याचं प्रतिपादन सुधीर मुनगंटीवार यांनी केले. वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या ६ लाख ५२ हजार लोकांच्यावतीने हा पुरस्कार स्वीकारत असल्याचं मुनगंटीवार यांनी सांगितलं. ​पुढील तीन वर्षात 50 कोटी वृक्ष लागवड करण्याचा संकल्प वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी जाहीर केला. वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच लोकसहभागातून हा संकल्पन निश्चितपणे पूर्ण करू, असा विश्वास मुनगंडीवार यांनी व्यक्त केला.

 

पुढील बातमी
इतर बातम्या