मे महिना पावसाचा, अनेक ठिकाणी 'ऑरेंज अलर्ट'

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

महाराष्ट्रात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण केले आहे. अशा स्थितीत हवामान खात्याच्या अंदाजामुळे शेतकऱ्यांना पुन्हा एकदा धक्का बसला आहे. संपूर्ण मे महिनाभर अवकाळी पाऊस पडणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.

राज्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा स्थितीत हवामान खात्याच्या महाराष्ट्र वेदर अलर्टच्या अंदाजामुळे शेतकऱ्यांना पुन्हा एकदा धक्का बसला आहे. संपूर्ण मे महिनाभर अवकाळी पाऊस पडणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी वातावरण ढगाळ झाले आहे. काही ठिकाणी हलका पाऊसही सुरू झाला आहे. वातावरणातही दव दिसून येत आहे. हवामान खात्याने काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

हवामान खात्याने पुढील २४ तास अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले आहे. यादरम्यान अनेक ठिकाणी गारपीटही होऊ शकते.

मुंबईसह उपगर, पुणे, कोकण, गोव्यासह काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी सोसाट्याचा वारा वाहत असल्याने हवामान खात्याने शेतकर्‍यांना त्यांच्या पिकांची काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.धान्य, भाजीपाला, जनावरांचा चारा किंवा इतर साहित्याची योग्य व्यवस्था करावी असेही हवामान खात्याने म्हटले आहे.


हेही वाचा

मध्य रेल्वेच्या 'या' 15 स्थानकांवर वर्टिकल गार्डन्स उभारण्यात येणार

पुढील बातमी
इतर बातम्या