मुंबईत अतिवृष्टीचा इशारा, यलो अलर्ट जारी

शनिवारी राज्याच्या काही भागात चांगला पाऊस झाला. शनिवारी सकाळपासून विदर्भ, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात मध्यम ते जोरदार पावसाची नोंद झाली. त्याचप्रमाणे रायगड आणि रत्नागिरीमध्ये अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

महाराष्ट्राच्या विविध भागात पाऊस पडेल. तसेच नैऋत्य मोसमी पावसाने रविवारी मुंबई आणि दिल्लीच्या दिशेने आगेकूच केली असल्याचे हवामान खात्याने सांगितले.

पालघर, मुंबई, ठाणे आणि सिंधुदुर्गसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. गेल्या 24 तासांत मुंबई शहरात 104 मिमी, पूर्व उपनगरात 123 मिमी, तर पश्चिम उपनगरात 139 मिमी पावसाची नोंद झाल्याची माहिती हवामान खात्याने दिली.

राज्यात पुढील पाच दिवस मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. कोकण आणि विदर्भात काही दिवस मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे, सातारा, नाशिक येथेही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे मराठवाड्यातही पाऊस चांगला होईल.


पुढील बातमी
इतर बातम्या